HW News Marathi
महाराष्ट्र

‘…म्हणून ईडीसमोर हजर राहू शकत नाही’, अनिल परब यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई | राज्यकजे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली असून आज(३१ऑगस्ट) त्यांना ईडी कार्यालयात उपस्थितीत राहायला सांगितलं होतं, मात्र ते आज(३१ ऑगस्ट) अनुपस्थितीत होते. त्यांनी याबाबत ईडीला त्यासंबंधीचं पत्र देखील धाडलं आहे. यामध्ये त्यांनी अशीही मागणी केली आहे की, आपल्याला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत मिळावी. असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

काय आहे पत्रात?

‘मी मंत्री आणि एक लोकसेवक असल्याने माझे कार्यक्रम हे 15 दिवसांपूर्वीच ठरले होते. माझे ठरलेले कार्यक्रम हे रद्द करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जी नोटीस मला बजावली आहे त्यादिवशी मला हजर राहता येणार नाही. मला चौकशीला हजर राहण्यासाठी दोन आठवड्यानंतरची कोणतीही तारीख द्यावी.’

‘याशिवाय आपण जे समन्स मला बजावलं आहे त्यामध्ये आपण नमूद केलेलं नाही की, कोणत्या विषयासंबंधी आपण मला चौकशीसाठी बोलावलं आहे. आपण कोणत्या प्रश्नी चौकशी करणार आहात याची देखील माहिती द्यावी. जेणेकरुन त्यासंबंधी आवश्यक गोष्टी मी आपल्यापुढे सादर करु शकेल.’ असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल परब यांनी ईडीने पाठवललेल्या समन्सचं उत्तर ईडीने स्वीकारलं आहे. त्यामुळे आता परब यांनी मागितलेली 14 दिवसांची मुदत ईडी मान्य करणार का? की, त्यांना तात्काळ दुसरं समन्स बजावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता पुढील काळात या संपूर्ण घडामोडी अधिक वेगवान होणार आहेत.

दुसरीकडे याप्रकरणी शिवसेनेकडून सातत्याने भाजपवर निशाणा साधला जात आहे. ईडी फक्त आणि फक्त भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप शिवसेना आणि इतर पक्षांकडून आता केला जात आहे. अशावेळी आता भाजप या सगळ्याला नेमकं कसं उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनिल परबांना ईडीकडून नोटीस

महाविकास आघाडी सरकारवर ईडीचं सावट आहे राज्यासकरकर कडून वेळोवेळी सांगितलं जातंय. यातच आता राज्यचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी कडून नोटीस आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृष्णा कारखाना निवडणूक, शरद पवार-पृथ्वीराज चव्हाण भेटीने पुन्हा चर्चेला उधाण

News Desk

दहा लाख रूपये घेऊन तिकीट कट -सोशल मीडियावर विडीओ वायरल

News Desk

हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या, शिवसेनेची मागणी

News Desk