HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटना अध्यक्ष सदाभाऊ खोत करत होते. मात्र आता या आंदोलनाचे नेतृत्व गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे गेले. कर्मचाऱ्यांच्या या संपाला आता बरोबर एक महिना पूर्ण झाला. मात्र अजूनही 72 हजारांहून अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाची बाब म्हणजे ही चर्चा वेतनवाढीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या तफावतीवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. या पगाराच्या तफावतीवरुन अनिल परब मान्यताप्राप्त एसटी संघटनांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा काही प्रमाणात पगार वाढ होणार का? अश्या चर्चांना आता उधाण आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत तफावत

१) 10 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाचं एकूण वेतन 28 हजार 800 झालंय. तर सरकारी चालकाला 10 वर्षांनंतर 40 हजार पगार मिळतो. म्हणजे 11 हजार 200 रुपयांची तफावत आहे.

2) एसटी कर्मचाऱ्यांच्या नवनियुक्त चालकाचं एकूण वेतन 24 हजार 595 करण्यात आलंय. सरकारी कर्मचारी जो चालक आहे, त्याला एकूण वेतन 35 हजार मिळतं. इथं 10 हजार 405 रुपयांची तफावत आहे.

3) कंडक्टर लिपीका आणि चालकाच्या पगारात एक ते 2 हजारांचाच फरक असतो. त्यामुळं अनिल परबांसोबतच्या बैठकीकडे पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

4) 20 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाला एकूण वेतन 41 हजार 40 रुपये मिळेल. तर सरकारी चालकाला 45 हजार पगार मिळतो. इथे 3 हजार 960 रुपयांची तफावत आहे.

5) 20 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाला एकूण वेतन 41 हजार 40 रुपये मिळेल. तर सरकारी चालकाला 45 हजार पगार मिळतो. इथे 3 हजार 960 रुपयांची तफावत आहे.

पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर…

सतत आर्थिक भार सोसत राहायचं आणि त्या बदल्यात एसटी बंद ठेवायची असंही होणार नाही. सरकारला विचार करावाच लागेल. पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर पैसे न दिलेले काय वाईट आहे. असा विचारही सरकार करु शकतं. कामगारांचं मागणं, त्यांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं कामच आहे. त्यामुळे संप मिटला तर ज्या छोट्या मागण्या त्यांनी केल्या त्यावर नक्की विचार केला जाईल, असं आश्वासन देत असल्याचं परब यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk

”जिथे विषय गंबीर तिथे मनसे खंबीर” मनसे देणार पद्मावतला पाठिंबा

News Desk

धुळे महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर ! करेक्ट कार्यक्रम गंडला ….

News Desk