HW News Marathi
महाराष्ट्र

धुळे महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर ! करेक्ट कार्यक्रम गंडला ….

धुळे | महापालिकेच्या दुसऱ्या टर्नसाठी महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. धुळे महापालिकेतील महापौर निवडीतही भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम लागणार का? असा प्रश्‍न सर्वांसमोर होता. मात्र भाजपने महापालिकेवरील सत्‍ता कायम राखत महापौर पदाची धुरा प्रदीप कर्पे यांच्‍याकडे सोपविली आहे.

भाजपतर्फे प्रदीप कर्पे यांना उमेदवारी

गेल्या काही महिन्यांपासून महापौर आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायप्रविष्ट असलेल्या महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर धुळे महापालिका महापौरपदाची निवडणूक प्रक्रीया पार पडली. यामध्ये धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० नगरसेवकनी ऑनलाईन पद्धतीने प्रदीप कर्पे यांना मतदान करून विजय मिळवला….

धुळे महापालिकेच्या दुसऱ्या टर्नसाठी महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज धुळे मनपात ऑनलाईन पद्धतीने पार पडली. धुळे महापालिकेतील महापौर निवडीतही भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम लागणार का? असा प्रश्‍न सर्वांसमोर होता. मात्र भाजपने महापालिकेवरील सत्‍ता कायम राखत महापौर पदाची धुरा प्रदीप कर्पे यांच्‍याकडे सोपविली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज; संजय राऊतांचा टोला

Aprna

लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही !

News Desk

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

News Desk