मुंबई | “राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केले आहे, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
“ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही,” असेही अनिल परब म्हणाले आहेत.