HW News Marathi
महाराष्ट्र

१४ एप्रिल रोजी होणार रोकडरहित (कॅशलेस) व्यवहार जनजागृती कार्यक्रम

नागपूर येथील डिजीधन मेळाव्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे नांदेड जिल्ह्याती या कार्यक्रमात होणार थेट. प्रक्षेपण

उत्तम बाबळे नांदेड :- नागपूर येथे १४ एप्रिल रोजी देशातील शंभरावा (शतकी) मेळावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत होणार असून यानिमित्ताने नांदेड जिल्हास्थानी,जिल्ह्यातील तालुका व ग्रामस्तरापर्यंत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या जनजागृतीबाबत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहेत.या कार्यक्रम स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर येथील भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत १४ एप्रिल २०१७ रोजी नागपूर येथे देशातील शंभरावा (शतकी) डिजीधन मेळावा होणार आहे.यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामस्तरापर्यंत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या जनजागृतीस्तव विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत.त्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात १० एप्रिल रोजी बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी, प्रतिनीधीं व आदींची उपस्थिती होती. सदरील बैठकीत प्र.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गाव,तालुका,उपविभागीय आणि जिल्हास्तरावरील डिजीधन उपक्रमांच्या आयोजनाबाबत निर्देश दिले.त्यानूसार प्रत्येक गावातील नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायती, तसेच सेतू केंद्र, तालुकास्तरावर आणि उपविभागस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय कार्यक्रमांत बँक अधिकारी कॅशलेस व्यवहारांबाबत सादरीकरणासह माहिती देतील. काही व्यापारी, व्यावसायिकांना प्वाईंट ऑफ सेल्स (पीओएस) मशिन्सचे वितरणही या दिवशी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध व्यापारी, व्यावसायीक, उद्योजक यांच्या संघटना, त्यांचे पदाधिकारी आदींना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धांचे, कॅशलेस व्यवहारांबाबत उल्लेखनीय काम करणारे घटक, आधार सिडींग, मोबाईल सिंडीग आणि मोबाईल बँकींगबाबत जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करणाऱ्या घटकांना सन्मानित करण्यात येणार आहे. नांदेड जिल्यात शुक्रवार ,१४ एप्रिल रोजी सकाळी १०:०० ते १२:०० वाजता या वेळेत या डिजीधन उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२:०० वाजता नागपुर येथील कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधीत करतील. त्यांच्या या भाषणाचे थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी, वेबकास्टिंगच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.ते प्रक्षेपण जिल्ह्यायातही या कार्यक्रमस्थळी दाखविण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमासाठी संबंधित घटकांनी वेळेत नियोजन करावे,आयोजन करावे, तसेच कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिक सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपली नाही, दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”

News Desk

#CoronaVirus : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ वर, तर पुणे ३, सातार १ रुग्णांची वाढ

swarit

अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा!- सचिन सावंत

News Desk