मुंबई। मुंबईला हादरवून सोडणार प्रकार घडला आहे. मुंबईच्या साकीनाका भागात बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. एका टेम्पोत ३४ वर्षीय महिलेवर गुरुवारी मध्यरात्री बलात्कार महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवला. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी हि घटना. या घटनेतील महिला प्रकृती गंभूर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.मोहन चौहान या आरोपीला त्यांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला असून खैरानी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याची माहिती दिली. पोलिस तिथे पोहोचली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती महिला जखमी आढळली. तिला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवलेला आढळून आला.
काय आहे निर्भया प्रकरण?
18 डिसेंबरला देशाच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. निर्भयाच्या बलात्काऱ्यांना मृत्यूदंड देण्याची खासदारांनी मागणी केली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तसं आश्वासनही दिलं.
दरम्यान निर्भयाच्या गुन्हेगारांना पकडण्याची मागणी जोर धरत होती आणि देशभरातील आवाज आणखी वाढत होता. देशभर ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे झाले.
परिणामी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवरील दबाव वाढत गेला. याचा परिणाम तपासाच्या गतीतही झाला. आठवड्याभरातच दिल्ली पोलिसांनी या कृत्यातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
17 डिसेंबर रोजी मुख्य आरोपी असलेला बसचा चालक राम सिंहसह तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर 21-22 डिसेंबर रोजी इतर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या. यामध्ये चालकाचा भाऊ मुकेश सिंह, जिम इंस्ट्रक्टर विनय शर्मा, फळ विक्रेता पवन गुप्ता, बस हेल्पर अक्षय कुमार सिंह आणि एक अल्पवयीन (वय 17 वर्षे) या आरोपींचा समावेश होता. म्हणजेच, 22 डिसेंबरपर्यंत सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.