HW News Marathi
महाराष्ट्र

फसव्या बाळूमामाला अटक!

मालेगाव। प्रसिद्ध बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूक करण्याऱ्या मनोहर मामा भोसले याला बारामती पोलिस आणि पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. बाळूमामा यांच्या नावाने बनाव करून लोकांना फसवण्याचा आरोपा खाली त्याला अटक केली आहे.

बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीचा थायरॉईड बारा करतो असे सांगून मनोहर सह तिघांना संगनमत करिन रुग्णांच्या कुटुंबियांकडून २ लाख ५१ हजार रुपये लुटून त्यांची फसवणूक केली. हे असले प्रकार गेल्या ३ वर्षांपासून सुरु आहे. शशिकांत सुभाष खरात यांनी गुरुवारी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मनोहर मामा भोसले, विशाल वाघमारे, ओंकार शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोण आहेत बाळूमामा?

संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गांव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला.

समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो.संतांना चमत्कार करण्याची इच्छा-हौस नसते. पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांनासुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले, ही वास्तवता होय.

संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यावाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामानी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. आपण शिंप्याचे उदाहरण घेवू. शिलाई यंत्र, शिवण्याचे तंत्र, इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना, पण एखादा शिंपी विशेष डौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो. त्याप्रकारे तो चमत्कार केलेल असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने किरीट सोमय्या आणि राणांना रोजगार मिळवून दिलाय; नीलम गोरेंचं टीकास्त्र

Manasi Devkar

ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा.. मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा, नितेश राणेंचे सुचक ट्विट

News Desk

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk