HW News Marathi
महाराष्ट्र

भारताच्या अवनी लेखराकडून आणखी नेमबाजीत रौप्यपदक!

नवी दिल्ली। टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराने पुन्हा एकदा कमाल करुन दाखविली आहे. तिने शुक्रवारी 50 मीटर राइफल 3 पोजिशन SH1 स्पर्धेत रौप्यपदकाचा वेध घेतला. 445.9 गुणांसह तिने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. अवनीच्या या कामगिरीमुळे टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पदकसंख्या 12वर जाऊन पोहोचली आहे.यापूर्वी अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल ठरलं होतं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली होती.

अवनी लेखरा 11 वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं. अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.

प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचा धमाका सुरुच आहे. भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकलं आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदकं जिंकली होती. आता प्रवीण कुमारच्या पदकासह भारताच्या ताफ्यात 11 वं पदक जमा झालं आहे. यामध्ये 6 रौप्य पदकांचा समावेश आहे.

हा आशियाई विक्रम ठरला आहे

प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.

भारताला आतापर्यंत इतकी पदकं

पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता 12 झाली आहे. भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्य पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिकच्या एका वर्षातील ही भारताची सर्वोत्तम संख्या आहे. भारताने रिओ 2016 आणि 1984 च्या पॅरालिम्पिकमध्ये प्रत्येकी चार पदके जिंकली होती.0

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता १७ जानेवारीला होणार सुनावणी

Aprna

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’, गोपीचंद पडळकरांचा विजय वडेट्टीवारांवर हल्ला

News Desk

रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

News Desk