HW News Marathi
महाराष्ट्र

अंबानी स्फोटक प्रकरण | प्रदिप शर्मा यांच्या घरी छापे, मुंबई NIA ची कारवाई

मुंबई | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घऱी एनआयएन छापा टाकला आहे. आज (१७ जून) सकाळी एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. उद्योगपती अंबानी धमकी प्रकरण तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई NIAनं ही कारवाई केली आहे. प्रदिप शर्मा यांच्या घरी NIAनं छापे टाकले आहेत. सकाळी 6.30 च्या सुमारास शर्मा यांच्या अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आले. प्रदीप शर्मा यांना एनआयएनं ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

 

मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी हा छापा टाकला आहे. दरम्यान आता प्रदिप शर्मा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. तसंच कार मायकल रोड प्रकरणी देखील महत्वाची माहिती NIA च्या हाती लागलीय आहे. दोन दिवसांपूर्वीच NIA ने संतोष आणि आनंद या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून काही नवीन खुलासे झाले आहेत.

मुंबईतील स्फोटक कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन

मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दोन जणांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. एकाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. या दोघांचा या प्रकरणामागे काय हात होता, याचा तपास एनआयए करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘२०१९ ला सरकारने केलेली तशी मदत करा’, कोल्हापूरातील पुरग्रस्तांची फडणवीसांकडे मागणी

News Desk

“किती वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांची फसवाफसवी?” – सोमय्या

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! रामदास आठवलेंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

News Desk