HW News Marathi
महाराष्ट्र

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांना फोनवर विनवणी, परवानगी न दिल्यास आशिष शेलारांचा आंदोलनाचा पवित्रा!

सोलापूर। भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार सध्या दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं सोलापूरमध्ये स्वागत केलं. आशिष शेलारांनी यावेळी आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. तर, दहीहंडी उत्सवाच्या विषयी विचारले असता आशिष शेलार यांनी कमी उंचीच्या दहीहंडीला राज्य सरकारननं परवानगी दिली नाही तर आंदोलन करु असा इशारा दिला.

मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीच्या विनवणी साठीच फोन केलाय

दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीच्या विनवणी साठीच फोन केलाय. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या जास्त उंच नसलेला असा पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव आम्हाला करू द्या, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. पारंपारिक कमी गर्दीच्या, कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली पाहिजे जर नाही दिली तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचंही यावेळी आशिष शेलार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित

जादूटोणा केल्याच्या कथित कारणामुळं चंद्रपूर इथे झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दल आशिष शेलार यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.पोलिसांवरचा सरकारचा वचक निघून गेलाय. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत ,सामान्य माणसांचा जीव असुरक्षित झाला आहे ,कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची हात जोडून विनंती करतो असही शेलार म्हणाले.

जनतेचे प्राण वाचवायचे असतील तर संस्कृती देखील समजूतीने घ्यावी लागेल

एकदा हे संकट पुर्णपणे घालवूयात… आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय.. ते लक्षात घेतलं पाहीजे… गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाहीये.आपण दूसर्या लाटेत डाँक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय… आता जी विंडो आपल्याला मिळालीय… तीचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नकोय… जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने घ्याव्या लागतील. गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या विधानसभेत सेना-भाजप स्वतंत्र लढतील यात शंकाच नाही !

News Desk

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या महिलेची साता-यात आत्महत्या

News Desk

बाबरी विध्वंस प्रकरणाचा न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही

News Desk