HW News Marathi
महाराष्ट्र

‘पुण्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल परत आंदोलन’, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडेंच्या चौकशीची मागणी!

पुणे। राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना भाजपा सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी सोमवारी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी मोबाईल परत करत आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकार्‍यांना देऊन टाकले. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली. तसेच यावेळी भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला

अंगणवाडी सेविकांना तत्कालीन भाजपा सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागामार्फत १ लाख ५ हजार महिलांना मोबाईल वाटप करण्यात आले होते. तेव्हापासून आज अखेर किमान ५० टक्के महिलांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत. त्याचा येणारा खर्च संबधित महिलांना करावा लागत आहे. तसेच हे मोबाईल महिलांना देण्यापूर्वी एका गोडाऊनमध्ये २ वर्ष पडून होते अशी माहिती समोर आली आहे आणि तेच मोबाईल आम्हाला देण्यात आले आहे. या मोबाईल खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या सर्व प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांची चौकशी पाहिजे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे.

२५० मोबाईल अधिकार्‍यांना देऊन निषेध

आमच्या महिलांना पगाराच्या निम्म्याहून अधिक खर्च मोबाईल आणि कागदपत्रा करता होतो. तो आम्हाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही हवेलीमधील २५० मोबाईल अधिकार्‍यांना देऊन निषेध व्यक्त करत आहोत. आता या सरकारने आम्हाला उत्तम दर्जाचे मोबाईल आणि त्यामध्ये मराठीमध्ये अॅप द्यावे अशी मागणीही शुभा शमीम यांनी यावेळी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही बहिण-भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष आणि राजकारण येऊच शकत नाही –  पंकजा मुंडे

News Desk

पुण्यात नोटाबदलीच्या रॅकेटमधील 5 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

News Desk

मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास सुरू

News Desk