HW News Marathi
महाराष्ट्र

मीडियाच्या फोटोग्राफर्स समोर अरबाज मर्चंटच्या बाबांची पोझ तर अरबाजने…..!

मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान हा राज्याच्या राजकारणात मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांनी शुक्रवारी (26नोव्हेंबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी कार्यालयासमोर हजेरी लावली. यावेळी अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CWu_AOrIVG4/?utm_medium=copy_link

व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे?

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट जामिनावर बाहेर आले आहेत. शुक्रवारी (26 नोव्हेंबर) त्यांना एनसीबी कार्यालयात नेहमीप्रमाणे जायचं होतं. आणि या एनसीबी कार्यालयातून बाहेर पडताना एक भन्नाट किस्सा घडला आणि सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला. अतिशय वेगाने येणाऱ्या अरबाज मर्चंटला त्याचे वडील अस्लम मर्चंट यांनी थांबवलं. क्षणभर भांबावलेल्या अरबाजला कारण समजलं नाही, त्यामुळे तो तसाच उभा राहिला. तेव्हा अस्लम यांनी लेकाला जवळ घेत त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि स्मितहास्य करत मीडियाच्या फोटोग्राफरसमोर पोझ दिली. आणि या वेळी मात्र अरबाज मर्चंट याने आपल्या डोक्याला हात मारून घेतला. म्हणून आता हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरबाज मर्चंटने आपल्या वडिलांचं हे कृत्य पाहून डोक्यावर हात मारला. थांबवा हे बाबा असं म्हणत अरबाज निघून गेला. जवळच असलेल्या आपल्या गाडीत तो बसला.

नेमकं प्रकरण काय?

२९ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन मंजूर केला होता. हायकोर्टाने आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. आज शुक्रवार असल्यामुळे अरबाज मर्चंट हा वडीलांसोबत एनसीबी कार्यालयात हजर होता. तसे दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागला आहे. मात्र या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळ आणि वडेट्टीवार चेहरे चमकावायला आले होते,आरक्षणावर रावसाहेब दानवे यांची टीका!

News Desk

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतले !

News Desk

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार! – चंद्रकात पाटील

Aprna