HW News Marathi
Covid-19

अर्णब गोस्वामी अडचणीत ! आता CID करणार ‘त्या’ आत्महत्या प्रकरणाची चौकशी

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अर्णब गोस्वामी यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या पुनर्चौकशीचे आदेश CID कडे देण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी गेल्या अनेक दिवसांपासून चांगलेच अडचणीत सापडले आहेत. काहीच दिवसांपूर्वी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपले पती अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले होते. तर अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक हिने देखील अनिल देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली. याच पार्श्वभूमीवर, अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीप्रमाणे सीआयडीमार्फत या प्रकरणाची पुनर्चौकशी करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी आज सांगितले आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अलिबाग पोलिसांकडे होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६,३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे २ गुन्हे दाखल करण्यात आले होते.”अर्णव गोस्वामींनी आपल्या वडिलांची देणी थकवून आपल्या वडील आणि आजीला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही बाब अलिबाग पोलिसांनी नीट तपासली नाही”, असे गृहमंत्र्यांकडे केलेल्या या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी म्हटले होते. अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

अखेर ‘ या ‘ देशाने कोरोनामुक्त होऊन दाखवलेच !

News Desk

काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमावरून भातखळकरांचा काँग्रेसला टोला

News Desk