HW News Marathi
देश / विदेश

“आता राज्याने कर्ज घेण्यासाठी ह्यांची शिकवणी लावायची का ?”

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल(२६ मे) राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडून राज्याला किती आर्थिक मदत करण्यात आली, याचा लेखाजोगा मांडला. देवेंद्र फडणवीसांनी ही संपूर्ण आकडेवारी दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आज (२७ मे) पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. महाविकासाआघाडी सरकारकडून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून अनिल परब, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, “देवेंद्र फडणवीसांच्या आभासी पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आहे”, असे अनिल परब म्हणाले. “देवेंद्र फडणवीसांनी केवळ आभास निर्माण केला, मोठमोठी चित्रे उभी केली. केंद्राने कशी राज्याला खूप मदत केली मात्र राज्य त्यातून काहीच करत नाही असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज आम्ही राज्यात प्रत्यक्षात स्थिती काय आहे ? सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहोत”, असेही अनिल परब म्हणाले.

अनिल परब यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे :

  • विरोधकांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली
  • महाविकासआघाडी कोणताही आभास निर्माण करू इच्छित नाही
  • विरोधी पक्षनेते म्हणतात केंद्राकडून राज्याला खूप मदत होत आहे पण जनतेला खरी स्थिती समजावी म्हणून पत्रकार परिषद
  • जयंत पाटलांनी कित्येक वर्षे अर्थ खाते सांभाळले, त्यामुळे आम्हाला सल्लागारांची आवश्यकता नाही.

फडणवीसांच्या दाव्यांवर भाष्य :

  • राज्याला केंद्राकडून ६ हजार ६०० कोटी मिळालेत
  • केंद्राने जी मदत इतर राज्यांना केली तितकीच महाराष्ट्राला केली.
  • केंद्राने महाराष्ट्राला कोणतीही जास्तीची मदत केलेली नाही
  • स्थलांतरीत मजुरांना १२२ कोटी महाराष्ट्राला मिळालेले नाहीत
  • १७५० कोटींचे गहू महाराष्ट्राला मिळालेले नाहीत
  • सगळ्या ट्रेन्सचे पैसे राज्याने दिले
  • राज्य सरकारने ६८ कोटी ट्रेनसाठी खर्च केले
  • एका ट्रेनला ५० लाखांचा खर्च कसा येतो ? फडणवीसांनी सांगावे
  • परवापासून ट्रेनच्या वेळापत्रकात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
  • रेल्वेचे नियोजन नसल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी
  • राज्याचे हक्काचे जीएसटीचे पैसेच अजून केंद्राने दिले नाहीत
  • पियुष गोयल नुसते ट्विटरवर घोषणा करतात
  • कायद्यात बसत नसलेले देऊच नका, कायद्यात बसतात तेच द्या
  • फडणवीस म्हणतात महाराष्ट्राला १ लाख ६० हजार कोटींचे कर्ज घेता येईल, कर्ज घेण्यासाठी आम्ही ह्यांची शिकवणी लावायची का ?
  • महाराष्ट्राचा ४२ हजार कोटींचा निधी केंद्राकडे थकीत
  • महाराष्ट्राचा गुजरातला १५०० ट्रेन्स महाराष्ट्राला ७००
  • केंद्राने आमच्यावर वेगळी काही मेहरबानी केलेली नाही
  • फडणवीसांनी सांगितलेले सगळे पैसे फक्त आभासी
  • जेवढ्या टेस्ट्स महाराष्ट्रात झाल्या तितक्या कुठेही नाही, मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट
  • १६११ कोटी आपत्ती निधीच्या कोटयातूनच दिलेले आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…प्रेत जेव्हा उठून बसते

News Desk

बॉक्सर लवलिनाची उपांत्य फेरीत धडक, भारताला आणखी एक पदक निश्चित

News Desk

ज्योतिरादित्य शिंदेंना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं

News Desk