HW News Marathi
महाराष्ट्र

देशभरात सुमारे 5000 महिलांनी केली कुपोषणाबाबत जनजागृती

मुंबई | ग्रामीण भागातील महिलांमध्ये कुपोषण, रक्तक्षय आणि जन्मतःच कमी वजन असलेल्या बालकांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू -जीकेवाय) आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरएसईटीआय) या दोन्हींमधील ५,००० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी देशभरात १०० हून अधिक रॅली काढल्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत ग्रामविकास मंत्रालय साजरा करत असलेल्या ‘आयकॉनिक वीक’ चा एक भाग म्हणून ‘कुपोषण से आझादी’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण महिलांमध्ये पोषणाचे महत्त्व अधिक अधोरेखित करण्यासाठी, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, प्रकल्प अंमलबजावणी संस्था (पीआयए), कार्यक्रम लाभार्थी इत्यादी विविध संबंधितांनी रॅली काढली. या रॅलीचा एक भाग म्हणून महिला प्रशिक्षणार्थींनी माहितीपूर्ण फलक आणि पोस्टर्स घेऊन गावोगावी पदयात्रा आणि सायकल यात्रा काढल्या.

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू – जीकेवाय) ही २५ सप्टेंबर, २०१४ रोजी सुरू करण्यात आली, भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाद्वारे निधी पुरवठा केला जाणारा हा देशव्यापी रोजगार-संलग्न कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. ग्रामीण भागातील गरीब तरुणांमध्ये रोजगाराशी संबंधित कौशल्ये विकसित करण्याचा आणि त्यांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये वेतन रोजगार देण्याचा दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा प्रयत्न आहे. किमान ७०% प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराची हमी देणारी आणि किमान अनिवार्यता प्रमाणपत्र देण्यासाठीची रचना या कार्यक्रमात आहे.

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रम २७ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोजगारावर भर देऊन ग्रामीण भागातील गरीब तरुणांसाठी राबवण्यात येत आहे. ८७१ हून अधिक प्रकल्प अंमलबजावणी संस्थांच्या माध्यमातून २३८१ हून अधिक प्रशिक्षण केंद्रांद्वारे ग्रामीण भागातील गरीब तरुणांना सुमारे ६११ विविध रोजगारांच्या प्रकारांशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते.या कार्यक्रमाअंतर्गत २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण ११.५२ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि ७.१५ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून (५९ राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (एनएसस्क्यूएफ)द्वारे रचना केलेल्या आणि ग्रामविकास मंत्रालयाकडून मंजूर ५) ६४ अभ्यासक्रमांमध्ये २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण ४०.३ लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि 28.39 लाख प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सध्या २३ आघाडीच्या बँकांनी (सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र तसेच काही ग्रामीण बँका) प्रायोजित केलेल्या ५८५ कार्यरत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?

News Desk

कर्जबाजारी शेत-यांने केली आत्महत्या

News Desk

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर…..!

News Desk