HW News Marathi
महाराष्ट्र

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर…..!

मुंबई। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टनंतर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीनंही एक फेसबुक पोस्ट केली. यामध्ये त्याने पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा. त्यावर पंकजा यांनी देखील सविस्तर उत्तर दिलं.

पंकजा मुंडे यांचा उत्तर….

जरूर लक्ष्मण मी ते करेन … आम्ही पहिल्यांदा अमेरीका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्‍या सख्या घेऊन… आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी incharge नाही राहिले .. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची .. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार.. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत,आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या ईलाज साठी मदत, covid 19 मध्ये covid centre, पूर ग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्या साठी करणे म्हणजे जगणे आहे..आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्या शिवाय काहीही नाही होऊ शकत..

पंकजा मुंडे यांनी केली होती फेसबुक पोस्ट..

पंकजा मुंडे यांनी स्वत: फेसबुकद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पंकजा मुंडे पोस्टमध्ये म्हणतात की, हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील “पंकजा कुठे आहे?” मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमनच्या आईच्या रोल मध्ये मी १०० टक्के आहे, किमान पुढचे ८ ते १० दिवस. आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या हॉस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे असं त्या म्हणाल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

पंकजा मुंडे यांच्या या पोस्टवर लक्ष्मण खेडकर नावाच्या व्यक्तीनं पोस्ट केली. ते म्हणतात की, मा.पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय असी बातमी सोशल मिडीयावर वाचली, आनंद वाटला, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा, पंकजाताई ,आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉस्पिटलमधून चोरी झालेलं बाळाला पोलिसांनी 24 तासात शोधून काढले

swarit

तो ‘माय का लाल’ समाधान आवताडे, पडळकरांचा अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याला टोला

News Desk

आरोपीच्या सांगण्यावरून कारवाई कशी होऊ शकते? हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

News Desk