HW News Marathi
Covid-19

अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत देणार

मुंबई | राज्यात कोरोनाचे वाढते संकट पाहता लोकांनी प्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करुन खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तत्परतेने पुरवावे. या कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च भागविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात एकाच दिवसात ४ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ४ हजारांहून अधिक मृत्यू

News Desk

#मिशनबिगीनअगेन : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल

News Desk

मोफत लसीकरणाच्या राज्याच्या निर्णयाचे स्वागत, मोहिम सुरुळीत पार पडावी !

News Desk