HW News Marathi
Covid-19

राज्यासह मुंबईची स्थितीही चिंताजनक ! आज 10 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत चालली आहे. राज्यात आजही (६एप्रिल) नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 55 हजारांच्या पार गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, “राज्यात आज 55 हजार 469 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज नवीन 34 हजार 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात सद्यस्थितीत एकूण 4 लाख 72 हजार 283 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.98% झाले आहे.

एकट्या मुंबईत आज 10 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा एकिकडे 55 हजारांच्या पार गेला आहे. तर दुसरीकडे एकट्या मुंबईत त्यापैकी 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मुंबईत आज 10 हजार 30 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ह्याच एका दिवसात शहरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकही लॉकडाऊन ! उद्यापासून १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

News Desk

चिंताजनक! दिवसभरात राज्यात ३९,५४४ नवे कोरोनाबाधित

News Desk

पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९० टक्क्यांवर

News Desk