HW News Marathi
महाराष्ट्र

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग; मलिक म्हणाले, व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवा…..

मुंबई।अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबई क्रूझ ड्रग्ज रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एनसीबीने आर्यन खानची काऊन्सिलिंग केल्याची माहिती समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करणाऱ्या एनसीबीच्या अधिकार्‍याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे, असं थेट आव्हान नवाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे.

शरद पवारांवर केलेल्या एकेरी उल्लेखाचाही समाचार

एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग करण्यासाठी तुरूंगात गेले होते का? असा सवाल करत देशातील मोठे वकील हरीश सालवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असाही थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या एकेरी

उल्लेखाचाही समाचार घेतला. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली. त्याचबरोबर पवारांबद्दल आदर असल्याचंच पाटील यांनी म्हटले आहे. ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी आपली चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी, असा खरमरीत टोला मलिक यांनी लगावला.

20 ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच

आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आर्यन खान तसेच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी विरोध केला. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बर्ड-फ्लूची भीती पळवण्यासाठी नागपूरमध्ये चिकन- अंडी महोत्सवाचे आयोजन

News Desk

“शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?” अतुल भातखळकरांची खोचक टीका!

News Desk

“पवाराचं कलरफुल राजकारण आहे”, गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल!

News Desk