HW News Marathi
Covid-19

आषाढी वारी कशी असावी यासाठी चोपदारांनी सुचवले पर्याय

पंढरपुर | पंढरपुरातील स्थानिकांची आणि वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेत यंदाचा आषाढी वारीचा सोहळा पार पाडावा अशी विनंती सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांनी केली आहे. दरम्यान, चोपदारांनी वारीच्या स्वरुपाबाबत पर्याय दिला आहे.

आळंदीतून परंपरेप्रमाणे पालखी १३ जूनला प्रस्थान करेन. दररोज पहाटे ते दुपारपर्यंत १५ तर सायंकाळी १० असे एकूण २५ किलोमीटरचे अंतर पायी वारकरी कापू शकतात. तसेच, सरकारने पालखी सोहळ्याच्या काळात गाव लॉकडाऊन ठेवावे. आवश्यकता असल्यास रथ, पालखी, घोडे. पादुका डोक्यावर घेऊन प्रवास करु शकतो का याचाही विचार करावा. प्रत्येक गावामध्ये थरवलेले २ प्रतिनिधी सर्व गावाच्या वतीने दर्शन घेतील.

इतर महत्वाचे मुद्दे –

  • सरकारने निश्चित केलेल्या वारकऱ्यांचे वय ६० पर्यंत असावे.
  • त्यांची कोरोना चाचणी केलेली असावी.
  • सोहळ्याचा मुक्काम गावठणात न करता माळरानात करावा.
  • या वर्षापुरते रिंगण सोहळे रद्द करुन तेथील परंपरेप्रमाणे सोपस्कार औपचारिक पूर्ण करावे.
  • वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुनच पंढरपुरात प्रवेश द्यावा.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना टेस्टींगमध्ये महाराष्ट्र नंबर १, राज्यात दररोज ७००० पेक्षा जास्त टेस्ट होतात !

News Desk

लसीचे दोन्ही डोस घेऊनही ​​​​​​​केईएम रुग्णालयातील 29 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

News Desk

मुंबईतील रूग्ण संख्या २० हजारांचा टप्पा ओलांडला तर…!

Aprna