HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेला अजान प्रेम असताना,गीतापठण उपक्रम कौतूकास्पद,आशिष शेलारांचा टोला

ठाणे | सत्ताधारी शिवसेना अजान प्रेमात पडली असताना ठाणे भाजपाने आयोजित केलेला गीतापठन व वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम कौतूकास्पद आहे, असा टोला भाजपाचे ठाणे प्रभारी व आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. एकीकडे शिवसेनेची अजान स्पर्धा, तर दुसरीकडे भाजपने घेतलेली गीतापठण व वंदेमातरम गायन स्पर्धा यातून राष्ट्रभक्ती कोण करीत असल्याचे ठाणेकरांना स्पष्ट होत आहे, असे शेलार यांनी सांगितले आहे.

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि गीता जयंती असा दुहेरी योग जुळून आल्याबद्दल भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने सहयोग मंदिरात गीता पठण व बुद्धीजिवी प्रकोष्ठच्या वतीने वंदेमातरम गायन स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार शेलार बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदिप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी आदी उपस्थित होते.

हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली. संतुलीत जीवन जगण्याबरोबरच कर्तव्य व भावना यांची सांगड भगवद्गगीतेत घातली आहे. त्यासाठी गीतापठण महत्वाचे आहे. तर राष्ट्रभावना जागृत राहण्यासाठी वंदेमातरम गायन गरजेचे आहे, असे मत श्री. शेलार यांनी व्यक्त केले. शिवसेना अजान स्पर्धा आयोजित करते. तर भाजपाने राष्ट्रप्रेमासाठी वंदे मातरम व भगवद्गगीता पठण स्पर्धा घेतल्या. यात राष्ट्रभक्तीच्या दृष्टिने एक पाऊल पुढे कोणत्या पक्षाचे आहे, ते ठाणेकरांना कळत आहे. त्यातून तरी शिवसेनेने बोध घ्यावा, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

News Desk

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा मराठवाडा अतिवृष्टी पाहणी दौरा!

News Desk

जलसंपदाचे १०४ प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस! – जयंत पाटील

Aprna