HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?, भाजपचा सवाल

मुंबई | भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. विकास निधी वाटपावरून निशाणा साधला आहे. “मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय?, हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या” असा सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कमी विकास निधी देण्यात आल्याने भाजपाच्या नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

“६५० कोटी विकास निधीपैकी शिवसेना ९७ नगरसेवकांना २३० कोटी, भाजप ८३ नगरसेवक ६० कोटी, काँग्रेस २९ नगरसेवक ८१ कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला ३० कोटी… मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!” असं म्हणत शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर करताना सातशे कोटी रुपयांचा निधी नगरसेवकांच्या विकासकामांसाठी देण्यात आला. तर सन २०२१-२२ मध्ये ६५० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

उत्पन्नात मोठी घट असताना कोरोना काळात १६०० कोटी रुपये खर्च झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मात्र यावेळेस अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्यामुळे आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी तीन ते चार हजार कोटी निधीची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यावरून आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर याआधी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात येतील, शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठ विधान!

News Desk

“गिरीश कुठंय ?बायकांमागं फिरतोय का?” एकनाथ खडसेंची खळबळजनक ऑडिओ क्लिप

News Desk

एसटी संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण

News Desk