HW News Marathi
महाराष्ट्र

कोकण दौरा राज्यपालांचा ,चर्चा सोबत बसलेल्या आशीष शेलारांची !

रत्नागिरी | महाडच्या तळीये गावात जी दुर्घटना घडली त्याची पाहणी आज(२७ जुलै) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. तळीये गावात दरड कोसळून एका रात्रीत होत्याचं न्हवतं झालं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नेत्यांनी येऊन गावाची पाहणी केली आणि मदतीचा हाथ दिला आहे. भगतसिंह कोश्यारी हे तळीये गावात असताना त्यांच्या सोबत भाजप आमदार आशिष शेलार देखील हजार असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्यपाल हे भाजपचे आहेत का ?

राज्यपाल भागातसिंह कोश्यारी हे आज(२७ जुलै) तळीये गावाची पाहणी करत असताना त्यांच्या सोबत भाजप नेते आशिष शेलार असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे आता राजकीय चळवळींना उधाण येताना दिसत आहे. राज्यपाल हे भाजपचे नेते आहेत हे पुन्हा एकदा दिसून येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पाहणी करणार आहेत. भाजप आमदार आशिष शेलार हे देखील त्यांच्यासोबत असल्यामूळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद जुनाच

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. १२ आमदारांची रखडलेली यादी असो किंवा मग हिंदुत्वाचा विषय असो. अनेक विषयांवरुन राज्यपाल आणि सरकारमध्ये वादाचे खटके उडत असतात. दरम्यान, पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं ठरवल्यामुळे भाजपचे नेते राज्यपालांच्या दरबारी गेले होते. तसेच, १२ भाजपच्या ज्या आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केलं त्यासाठीही भाजपने राजभवन गाठलं होते. त्यामुळे या सगळ्यात राज्यपाल हे भाजपचे आहेत मात्र त्यांनी सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये समतोल राखला पाहिजे तो राखत नाही आणि वारंवार ते भाजप या पक्षाचेच असल्याचं दाखवून देतात अशी टीका सरकारकडून केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

swarit

“हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार”, अनिल परबांचा इशारा

Aprna

भाजपच्या ‘या’ विद्यमान आमदारांचा पत्ता कट ?

News Desk