मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू आहे. अशात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. SEBC मधून अॅडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मराठा आरक्षणाला स्थगिती देणार नाही, चुकीचा गैरसमज काही संघटना मुद्दाम पसरवत आहेत, असा खुलासाही अशोक चव्हाणांनी केला आहे. घटनापीठ स्थापन करण्यासाठी चार वेळा लेखी अर्ज सरकारने न्यायालयात केला. न्यायालय तारीख देईल, त्यावर टिपण्णी करणे योग्य नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.