HW News Marathi
Covid-19

कोरोनावर मात केल्यावर अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई | राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल १० दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 25 मे रोजी चव्हाण यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढील उपचारासाठी अशोक चव्हाण यांना २५ मेला नांदेड-मुंबई हा प्रवास करत रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आले होते.

२४ मे रोजी अशोक चव्हाण यांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर चव्हाण यांना रुग्णवाहिकेने नांदेडवरून मुंबईत आणण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळलं जात आहे. एवढं करूनही मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. जितेंद्र आव्हाडांच्यावेळी राज्य सरकारकडून बरीच गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात असतानाही फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनातून बरे झालेल्यांना आता TB संक्रमणाचा धोका..!

News Desk

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १४,८२१ कोरोना रुग्णांची नोंद, ४४५ जणांचा मृत्यू

News Desk

३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार असल्याच्या सर्व बातम्या चुकीच्या, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk