HW News Marathi
Covid-19

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांनाही टाकले मागे

मुंबई | देशामधील वेगवेगळ्या राज्यातील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स यांच्या संयुक्त विद्यामानाने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के ऐवढी झाली आहे. तर देशात इतर राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादी उद्धव ठाकरे यांनी पाचव्या क्रमांकावर जागा मिळवली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणच बदलून गेले. राज्यात बहुमत मिळालेल भाजप हे विरोधी पक्षाच्या बाकावर बसले तर, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकासआघाडीच्या रुपाने एक नवीन सत्ता समीकरण राज्यात उदयास आले. यात कधीही निवडणूक न लढलेले उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाता घेतली. तर उद्धव ठाकरे यांनी प्रशासन हाताळण्याचा अनुभव नसल्याची टीका ही विरोधकांनी केली. मात्र, कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळात उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक होते आहे. या सर्वेक्षणात राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केले. ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पसंती दिली.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची अशी आहे क्रमावारी

या सर्वेक्षणात ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटनायक यांना पसंती दिली. पटनायक यांच्या खालोखाल दुसर्‍या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसर्‍या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. चौथ्या स्थानावर व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) आहेत, तर पाचव्या स्थानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना ७६.५२ टक्के मते मिळाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता काहीशी कमी झाली असून ते सहाव्या स्थानी आहेत. त्यांना ७४ टक्के मते आहेत.

लोकप्रिया यादीमध्ये पहिल्या सहामध्ये भाजपचे राज्यातील मुख्यमंत्री नाही

देशातील सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादिमध्ये पहिल्या सहामध्ये भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचे नाव नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे ६७.२१ टक्के मते मिळवून आठव्या स्थानी आहेत. सर्वांत कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४,४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२ टक्के) यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणार्‍या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप महाराष्ट्राचा शत्रू कि मित्र ?, जयंत पाटलांचा सवाल

News Desk

मीपण विरोधी पक्षनेता होतो पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही,खडसेंची टिका

News Desk

कोरोनाची लस मोफत देणार असल्याच्या वक्तव्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची पलटी

News Desk