HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना – अशोक चव्हाण 

मुंबई | “मला कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करायचं नाही. मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे

आज (२ डिसेंबर) सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, मंत्री  एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली आहे.

“मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक होती. या बैठकीत गेल्या १०-१२ दिवसातील हायकोर्टाचे निर्णय आले आहेत. त्यावर चर्चा झाली. EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे कोर्टाने म्हटलं आहे. त्यातील सारांश तरी तेच सांगत आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्णय, EWS बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली,” असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

“आज खासदार संभाजीराजेही भेटणार आहेत. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. हा विषय न्यायालयात जाऊन सुटणार आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र आता ते जी भूमिका घेत आहेत, ती फार वेगळी आहे.”“सुप्रीम कोर्टात चार वेळा लेखी दिलं आहे. कोरोनामुळे कोर्टाची सुनावणीही व्हिडीओद्वारे होतं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत,” असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

Related posts

‘जम्बो’बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा – मुरलीधर मोहोळ

News Desk

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk

#CoronaVirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे !

अपर्णा गोतपागर