HW News Marathi
देश / विदेश

अशोक चव्हाण दिल्लीत दाखल, ‘या’साठी चव्हाणांची दिल्लीवारी

नवी दिल्ली | राज्यातील काही प्रमुख नेते अचानक दिल्लीत गेले की राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा सुरु होतात. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आज (२१ जुलै) दिल्लीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेणार आहेत. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चव्हाणांच्या दिल्ली वारीचं कारण हे मराठा आरक्षण आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण दिल्लीत गेले आहेत. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचायासोबत अशोक चव्हाणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण दिल्लीत गेल्याने मराठी आरक्षणाविषयी काय महत्वाची बातमी मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे आता संसदेचा मार्ग – अशोक चव्हाण

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणसाठी मोठा लढा सुरु झाला आहे. अशात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची फेटाळून लावल्याने वादाला सुरुवात झाली आहे. अशात केंद्राची पुर्नविचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे एक नवी तेढ निर्माण झाली आहे. यावरुन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे, हा पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा अधोरेखित केला. या घटनादुरुस्तीनंतरही मागासवर्ग निश्चिातीचा राज्याचा अधिकार अबाधित आहे, अशी भूमिका घेत केंद्राने केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आता केंद्राच्या अखत्यारित गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UP Election 2022: अखिलेश यादवांना फक्त दलितांची मते हवीत! – चंद्रशेखर आझाद

Aprna

भंगारात सापडलेल्या नाण्याची किंमत दीड कोटी

News Desk

असा असणार यंदाचा स्वातंत्र्यदिन !

News Desk