HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी

परभणी | महाविकास आघाडी सरकारमध्ये काही बाबतीत आलबेल नसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक चव्हाण यांना यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजवण्याचं काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीमुळे नवा वाद निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करा! – अजित पवार

Aprna

अर्थसंकल्पात ठाकरे सरकारने ‘स्टॅम्प ड्युटी’मध्ये दिली ऐवढी सवलत

swarit

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला शॉक देण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

News Desk