HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

शिवशंकर निरगुडे | कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकल्याचे दिसून येते. आता पुन्हा एकदा संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये संतोष बांगर एका व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

 

हिंगोली शहरालगत असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. संतोष बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहितीसमोर येत आहे.

 

संतोष बांगरांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली याचे कारण जरी अस्पष्ट असले तरीही अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचेच आहे. आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायदळी तुडवतात हेच यावरून स्पष्ट दिसून आले. या विषयावर बांगरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 8 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई इथल्या मसाई मातेची यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावले जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. मात्र असे असताना देखील बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले ‘ते’ ६ मंत्री नाराज ?

News Desk

शाहीनबागला मुस्लिम संघटनेकडून फडिंग केल्याचा प्रविण दरेकरांनी केला आरोप

swarit

तीवरे धरण दुर्घटना : पाहणीनंतर शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk