HW News Marathi
महाराष्ट्र

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात अश्विनी भिंडेंची नियुक्ती

मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मेट्रो-३ च्या माजी संचालिका अश्विनी भिडे यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे.कोरोनाच्या संकटापासून सामना करण्यासाठी कोरोना वॉर रुम तयार करण्यात आली आहे. याच वॉर रुमच्या प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. वॉर रुमच्या माध्यमातून कोरोनाविषयकची सांख्यिकी माहिती एकत्र करून त्या माहितीचे विश्लेषण तयार करण्यात येणार आहे. या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे प्रतिबंधात्मक कार्यवाहीची व नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. यानुसार विभागस्तरीय नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्याने करण्यात येणार आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड कोरोना १९’च्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील २ अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. त्यात अश्विनी भिडे आणि डॉक्टर रामस्वामी एन. या २ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्या, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आरे वसाहतीमधील मेट्रो-३ च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवत ठाकरे सरकारकडून याआधी अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली होती. परंतू, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी भिडे यांच्याकडे आपत्कालीन व्यवस्थापनाची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदली घोटाळा प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात; भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नोटीसीची होळी

Aprna

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna

राष्ट्रवादीला गळती नाही, ‘हा’ तर राजकीय भ्रष्टाचार !

News Desk