HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात कोरोनाचा हाहाकार

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच, संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. परंतू अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. काल (३० मार्च) दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात एक धार्मिक सभा पार पडली त्यात हजारो दिल्लीतील नागरिक उपस्थित होते. या धार्मिक यात्रेत उपस्थित असलेल्या अनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. याची पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ तो परिसर सील करण्यात आला. दरम्यान, त्याचवेळी तेलंगणात कोरोनामूळे ६ मृत्यू झाले होते आणि मुख्य म्हणजे हे मृत ६ जण निजामुद्दीनच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होते. तसेच, कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी २०० जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

काल रात्री उशिरा हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. तातडीने दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी मेडिकल टीमसह घटनास्थळी पोहचले आणि परिसर बंद करण्यात आला. दरम्यान, या सगळ्यांचे रिपोर्ट आज (२१ मार्च) येणार आहेत. ‘निजामुद्दीन परिसरात काल एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये ८५ आणि आज ६८ लोकांना आणले आहे. हॉस्पिटलमध्ये निजामुद्दीन येथील १५३ लोकं दाखल असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमध्ये २००० पेक्षा जास्त प्रतिनिधी १ ते १५ मार्चपर्यंत तबलीग-ए-जमातमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती एलएनजेपीचे वैद्यकिय अधिकारी डॉक्टर जे. सी. पासी यांनी दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर, ४२ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर येणार

News Desk

शरद पवार ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार !

News Desk

Gujarat Assembly Election 2022 LIVE Updates: पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू

Aprna