HW News Marathi
महाराष्ट्र

जो आवडतो सगळ्यांना तोची आवडे देवाला! सातव यांच्यावर असिम सरोदेंची भावूक पोस्ट

ॲड.असीम सरोदे | राजकारणात मुळीच सुटेबल नसणारा, राजकीय नेता आहे असे न वाटणारा, कॉग्रेस च्या शिरशस्थ नेत्यांशी थेट संपर्क असलेला, राहुल गांधी च्या अत्यंत जवळचा मित्र असलेला राजीव सातव. मोठेपणा कधी मिळविणे नाही किंवा सांगणे नाही. साधे कपडे, देहबोलीतील विनम्रत, बोलण्यातील सभ्यता व चेहऱ्यावरील प्रसन्नता यांची नैसर्गिक व अमीट छाप टाकणारे व्यक्तिमत्व. टीव्ही वरील चर्चेत न चिडता, चेहऱ्यावरील आक्रस्ताळेपणा न आणता पण थामपणाने भूमिका मांडणारा व्यक्ती म्हणून सुद्धा राजीव सातव सगळ्यांच्या लक्षात राहील.

मलाच सगळे समजते असा अविर्भाव राजीव ला कधी शिवला नाही त्यामुळे त्याचे मोठे असणे अजून उठून दिसायचे व न सांगता लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे. परभणी, नांदेड, हिंगोली भागातील कुणीही शिकणारा, धडपडणारा मुलगा दिल्लीत गेला की त्याची व्यवस्था खासदार राजीव सातव आपल्या बंगल्यावर करणार हे नक्की. त्यांचा दत्ता नावाचा मॅनेजर/ सहकारी सगळ्यांची विशेष काळजी घायचे.

2018 मध्ये मी शेतकरी हक्कांचा विचार करून एक शेतकरी न्यायाधिकरण असावे, शेती मालाला योग्य भाव मिळावा व अयोग्य भाव असल्यास शेतकऱ्यांना दाद मागण्याचा हक्क असावा असा एक कायद्याचा मसुदा तयार केला. विधी महाविद्यालयातील काही विद्यार्थी माझ्यासोबत होते. राजीव सातव तेव्हा लोकसभेत खासदार होते. मी त्यांना नवीन कायदा तयार केलाय तुम्ही खाजगी विधेयक स्वरूपात तो संसदेत मांडावा असे सुचविले. ते पुण्याला आमच्या ऑफिस ला आले सगळा विषय समजावून घेतला व 2018 च्या लोकसभा अधिवेशनात कायद्याचा मसुदा लोकसभेत मांडला. तो कायदा खरच झाला असता तर आज कृषी कायद्यांवरून जो संघर्ष सुरू आहे तो सुद्धा टळला असता. ( खाली खा राजीव सातव यांनी कृषी विधेयक मांडले याची बातमी आहे ती बघावी)

त्यानंतर राजीव व माझ्या अनेक भेटी झाल्या. एका विशिष्ट पक्षाचा आहे याचा दुराभिमान नसलेला माणूस म्हणून राजीव सातव मला नेहमी मित्र वाटला. दिल्लीला त्यांच्या बंगल्यावर रात्री उशिरा झालेल्या चर्चा, सकाळचा ब्रेकफास्ट सगळे लक्षात राहील.

एकदा आमचे असे ठरले की गुजरात मधील पर्यावरणाच्या प्रश्नांवर काम करायचे. राजीव तेव्हा गुजरातचे प्रभारी होते. मी एका केससाठी दिल्लीला जाणार होतोच त्याने सांगितले की एक दिवस राहायच्या तयारीने ये. मग दुसऱ्या दिवशी माझी गुजरात कांग्रेस चा प्रमुख जितेंद्र बघेल याच्याशी भेट करून दिली. गुजरातमध्ये आधी पर्यावरण कायदा प्रशिक्षण व नंतर आवश्यकता असेल त्या पर्यावरण समस्यांच्या बाबतीत कायदेशीर स्पष्टता आणण्यासाठी पाऊल उचलायचे असे ठरले होते.

काही दिवसांपूर्वीच राजीव गंभीर आहे, जगण्याच्या शक्यता कमी होत आहेत हे कळले होते. मला वाटले फेसबुक वरील अनेकांच्या शुभेच्छा त्याच्यासाठी मिळवाव्या, अनेकांच्या चांगल्या भावनांची ताकद काही काम करेल केवळ आठवणी राहील्या. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही पण तरीही समाजोपयोगी मुद्यांवर एकत्र काम करण्याची तयारी दाखविण्यात एक परिपक्वता असलेला राजकीय नेता राजीव मध्ये दिसला. अनेकांना आपला मित्र वाटणारा राजीव सातव ज्या साधेपणाने जगला त्याच साधेपणाने दवाखान्यात स्वतः भरती झाला व त्याच साधेपणाने, गाजावाजा न करता निघून पण गेला.

विनम्र श्रद्धांजली !!

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

Aprna

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

News Desk

रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे! 

News Desk