HW News Marathi
महाराष्ट्र

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा

मुंबई | दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात स्वाती महाडिक यांची प्रेरणादाई कहानी विद्यार्थ्यांना वाचायला अभ्यासायला मिळणार आहे. वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा दहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्य पुस्तकात सांगण्यात आली आहे. लेफ्टनंट स्वाती महाडिक या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते.

स्वाती महाडिक यांनी पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत असलेल्या स्वाती महाडिक यांनी खचून न जाता देशसेवेसाठी प्रशिक्षण घेऊन सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यानंतर त्यांची प्रेरणादायी कहाणी विद्यार्थ्यांनी अभ्यासावी या करता दहावीच्या पुस्तकात सांगण्यात आली आहे.

साता-यासाठी अभिमानाची बाब

पतीच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून, पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम, अशी गौरवगाथा दहावीच्या पुस्तकात मांडण्यात आली आहे. दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध झाली आहेत. दहावीचे उन्हाळी वर्गही सुरुवात होत आहेत. यंदाच्या वर्षापासून दहावीच्या पुस्तकात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकजुटीचे शक्तीप्रदर्शन

News Desk

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

शरद पवारांवरील पीएचडी अपूर्ण पण आता अजित पवारांवर अभ्यास करणार – चंद्रकांत पाटील

News Desk