HW News Marathi
महाराष्ट्र

खेळण्यासाठी गेल्या चार मुलांचा वाळूसाठी केलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

बीड | केवळ पैशाच्या मागे लागलेल्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेवराई तालुक्यात वाळूमुळे लोकांचे जीव जात आहेत. तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे वाळूसाठी माफियांनी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा जीव गेला आहे. वाळू माफियाकडून हप्ते घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर आता तरी कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार बालकांचा खड्यात असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. तहसीलदार सचिन खाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदन देऊन अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, तांदळवाडी आणि शहजाणपूर या दोन्ही बाजूने सिंदफणा नदीत जेसीबी पोकलेनने दहा दहा वीस वीस फुटाचे खड्डे केले आहेत.

मोठ्या प्रमाणात या ठिकानाहून वाळू उपसा सुरू आहे. नदीपात्रात केलेल्या खड्यात पाणी साचलेले आहे. या पाण्यात बुडून या चार बालकांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणार्‍या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेवराई तालुक्यातील बहुतांश भागात सर्रास वाळू उपसा सुरू आहे अन तो ही महसूल अन पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने तहसीलदार खाडे अन त्यांचे तलाठी, मंडळ अधिकारी हे हप्ते घेण्यात व्यस्त असल्याने कोणत्याच वाळू माफियावर कारवाई होत नाही.दोनच दिवसांपूर्वी राक्षसभुवन येथे केणीचा दांडा लागून एका मजुराचा मृत्यू झाला होता.आज ही घटना घडली आहे. या वाळू माफियांच्या पाठीशी पोलीस अन महसूल प्रशासन ठामपणे उभे असल्याने रोज किमान चारशे ते पाचशे गाड्या वाळू उपसली जाते. यामध्ये नदीचे तर नुकसान होतच आहे पण लोकांचे जीव देखील जात आहेत. पण या वाळू माफियाकडून मिळणार्‍या लाखो रुपयांच्या हप्त्यापुढे कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. शहजाणपूर येथे घडलेल्या घटनेनंतर तरी जिल्हाधिकारी आणि एसपी जागे होऊन या भागात सुरू असलेला वाळू माफियांचा नंगानाच थांबवतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

“गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला येथे नदीपात्रातील खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजते आहे. जिल्हा प्रशासनास अधिक तपास व चौकशी तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असून अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती घेत असुन, शासकीय मदतीबरोबरच या घटनेला मानवी चुका कारणीभूत असतील तर, दोषी कुणीही असो, त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति मी सहसंवेदना व्यक्त करतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण | पीडितेची मृत्यूशी झुंज, आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

swarit

‘तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारा मी नाही’, भाजपकडून हसन मुश्रीफांना चोख उत्तर

News Desk

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा शरद पवारांनी घेतला समाचार!

News Desk