HW News Marathi
महाराष्ट्र

आटपाडी डेपोला कुलुप, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक!

सांगली। विधान परिषदचे आमदार गोपीचंद पडळकर हे एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोलाच आता कुलूप लावले आहे. एसटीचं जो पर्यंत विलीगीकरण होत नाही. तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्राच आता गोपीचंद पडळकर यांनी घेतला आहे.


गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. परंतु, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला मंत्र्यांना वेळ नाही.

आघाडीमधील मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला होता.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनं काल आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. आतापर्यंत राज्यात 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत राज्य सरकारचा एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

२८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ

शेवगाव डेपोतील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी एसटी बसलाच गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. यासंबंधी आमदार पडळकर यांनी म्हटले आहे, ‘ही घटना तळपायाची आग मस्तकात जाणारी, मनाचा थरकाप उडवणारी आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत दु:खद घटना घडली आहे. काकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे दु:ख शब्दात सांगणही कठीण आहे. माझी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका. एकजूटीने आपण हा लढा लोकशाही मार्गाने जिंकू. या आत्महत्या केलेल्या २८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ,’ असा दिलासा पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Tauktae Cyclone : मुंबईपासून150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

News Desk

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत! – तानाजी सावंत

Aprna

दत्ता पडसलगीकर यांच्या सेवा मुदतवाढीविरोधात रिट याचिका दाखल

News Desk