मुंबई। देशाला हादरवून टाकण्याचं मोठे षड्यंत्र भारतीय यंत्रणांनी उधळून लावलं आहे. तर पुन्हा एकदा मुंबई एटीएसने धडक कारवाई केली आहे. आता मुंबई एटीएसच्या पथकाने मुंब्रा परिसरातून बॉम्बस्फोटांचा कट रचल्याच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव इम्रान उर्फ मुन्ना भाई असं असल्याची माहिती मिळतेय.यापूर्वी या प्रकरणात झाकीर हुसेन शेखला अटक करण्यात आली होती. झाकीरची चौकशी केल्यानंतरच या संशयिताचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एटीएसने मुंब्रा परिसरात छापा टाकला.
बाहेर पडण्याचे काही गेट्स आणि एक्झिट्स बंद करण्यात आले
गुप्तचर संस्थांच्या अलर्टमध्ये असं सांगितलंय की, अतिरेकी ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या गाडीवर काही करण्याचा विचार करू शकतात. या सतर्कतेनंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली आहे. त्याचवेळी, खबरदारी म्हणून स्टेशनच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याचे काही गेट्स आणि एक्झिट्स बंद करण्यात आले आहेत.त्याचबरोबर हा आरोपी इम्रान उर्फ मुन्ना भाईला कोर्टात सादर केल्यानंतर मुंबई एटीएसची टीम त्याच्या रिमांडची मागणी करणार आहे.
खरं तर, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने तीन दिवसांपूर्वी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या दरम्यान 6 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यानंतर, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील जोगेश्वरी या ठिकाणाहून पकडलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.