HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

सोलापूर | भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर काल (३० जून) सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीचा काच फुटला आहे. मात्र, गाडीतील कुणालाही दगड लागला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

‘आज दगडफेक, उद्या गोळा मारतील’ – गोपीचंद पडळकर

महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही.

आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही. घोंगडी बैठक उरकुन बाहेर आहे. त्या बैठकीला चारशे-पाचशे लोक होते. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते.

मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावले समन्स

News Desk

‘त्या’ तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही, शरद पवारांचं भाष्य!

News Desk

पक्षातून बाहेर पडलो अन् माझ्या नावाचा जपच सुरु झाला !

News Desk