HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, भाजपचा उपहासात्मक सल्ला 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी राषअट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली होती. शरद पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

“पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,” अस अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.“पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी,” असा उपहासात्मक सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?”, प्रविण दरेकरांचा सवाल

News Desk

शिवसेनेने कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा केला निषेध   

News Desk

“केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा वाढवण्याचं धोरण”, सचिन पायलटनी लावला सरकारला बोल

News Desk