HW News Marathi
महाराष्ट्र

“या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये”, दहीहंडी निर्णयावरून अतुल भातखळकर आक्रमक

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(२३ ऑगस्ट) दहीहंडी पथकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून आता विरोधी पक्ष ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी तर उद्धव ठाकरेंना हिंदूविरोधी असं संबोधलं आहे. आपल्या या ट्विटमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच

अतुल भातखळकर हे नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून आघाडी सरकारवर निशाणा साधत असतात. दहीहंडी रद्द करण्याच्या निर्णयावरूनही त्यांनी ट्विट करत कह्णत व्यक्त केली आहे. “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये”, असं ते म्हणाले आहेत.

सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही

राम कदम यांनी ट्विट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. ते म्हणले, “काही गोविंदा पथकं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळेची दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही,” असं राम कदम या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील

सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजे, पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावी, लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार! – अजित पवार

Aprna

LIVE Updates : राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

Aprna