HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीनीकरण

कणकवली | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा भाजपमध्ये विलीनीकरण करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१५ ऑक्टोबर) कणकवलीमध्ये भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रसारासाठी जाहीर सभा आयोजित केला. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. यावेळीच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याची घोषणा केली.

या प्रचारसभेच मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. तसेच नितेश राणे भरघोस मतांनी विजयी होतील अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. एकूण मतदानाच्या ६५ ते ७० टक्के मते नितेश राणे मिळतील असेही मुख्यमंत्री सभेदरम्यान म्हणाले. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांच्या विरुद्ध सतीश सावंत हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पवारसाहेब, मुख्यमंत्री अन् आमचं नेते ‘या’ लढाईत माझ्या पाठिशी!;”

News Desk

कंगनाला न्यायालयाचा धक्का, नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले

News Desk

“अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” – राज ठाकरे

News Desk