मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद दिसू लागले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोलिस तक्रार केली आहे. भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
अतुल भातखळकर यांनी तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, “परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मी तक्रार दाखल करणार आहे. एका विशिष्ट समाजात द्वेष पसरवणं, भीती पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे”.
मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा माझा मुख्यमंत्र्याना सवाल आहे. सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. pic.twitter.com/5ETmfh2JoK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 14, 2021
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले वक्तव्य हे १०० टक्के बेशरमपणाचं, घटनेच्या विरोधी आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. एका केस संदर्भात चर्चा करत असतांना मुख्यमंत्री म्हणतात परप्रांतीयांवर आम्हाला नरज ठेवावी लागेल, असं म्हणतात. म्हणजे बलात्कार करणाऱ्याचा धर्म कोणता, जात कोणती हे बघून तूम्ही निर्णय घेणार आहात का?, असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत, असे सांगत राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.