मुंबई | भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या विधानावरून देखील टोला लगावला आहे.
“शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या PMC बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा भांडुपच्या ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?’ मॉलमधील अनधिकृत सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी आहेत”, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा अनधिकृत सनराईझ हॉस्पिटलशी थेट संबंध आसून त्याच्यामुळेच शिवसेनेने या हॉस्पिटलला ओसी नसताना मंजूरी देण्याची कृपा केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला आहे. https://t.co/TNssxSWR3H
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 26, 2021
तसेच, पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा अनधिकृत सनराईझ हॉस्पिटलशी थेट संबंध असून त्याच्यामुळेच शिवसेनेने या हॉस्पिटलला ओसी नसताना मंजूरी देण्याची कृपा केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला आहे.” असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.
याचबरोबर, “मॉलमध्ये हॉस्पिटल पहिल्यांदाच पाहिले, कारवाई होणार असा इशारा देणाऱ्या महापौर किशोरीताईंनी डोळे उघडे ठेवून मुंबईत एक फेरफटका मारावा, आपल्या नाकाखाली आपल्याच मंडळींनी केलेले असे बरेच उपद्व्याप त्यांना पहिल्यांदाच बघायला मिळतील.” अशी टिप्पणी देखील महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर केली आहे.
मॉलमध्ये हॉस्पिटल पहिल्यांदाच पाहिले, कारवाई होणार असा इशारा देणाऱ्या महापौर किशोर ताईंनी डोळे उघडे ठेवून मुंबईत एक फेरफटका मारावा, आपल्या नाकाखाली आपल्याच मंडळींनी केलेले असे बरेच उपद्व्याप त्यांना पहिल्यांदाच बघायला मिळतील… pic.twitter.com/LlWLsBSlwo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 26, 2021
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं, बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असं वाटतं या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.” तसेच, “जर फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भात जर कार्यवाही झालेली नाही, तर त्यासंदर्भात जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजणांची प्रकृती गंभीर आहे.” असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.