HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे”,अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | भाजप आमदार अतुल भातखळकर हे नेहमीच महाविकासआघाडी सरकारवर टीका करत असतात. आत्ताचीही त्यांनी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ही चर्चा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना वंदन केल्याबद्दलची आहे. यावेळी त्यांनी ट्विटर अकाउंट वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी…

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांची आज(२०ऑगस्ट) जयंती आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केल्याची पोस्ट भातखळकर यांनी शेअर केली आहे. या पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धव ठाकरे सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पोस्ट शेअर केली आहे. ट्विट करून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थितांना ‘सद्भावना’ दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूरात ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज घुमला, मराठ्यांचा आक्रोश मोर्चा ! अनेकांची धरपकड

News Desk

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ म्हणाले हा… पवारांचे मिश्किल उत्तर

News Desk

“डिपॉझिट जप्त होऊनही माझी आमदार होण्याची इच्छा पूर्ण झाली”

News Desk