HW News Marathi
Covid-19

काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमावरून भातखळकरांचा काँग्रेसला टोला

पुणे। सध्या काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगचा फोटोही सध्या व्हायरल होत आहे. या उपक्रमावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. एवढ्या पैशात ५० छत्र्या आल्या असत्या म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

कांदिवली पूर्व मतदारसंघातले भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंगच्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या.” पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच उपक्रमामुळे भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

पुणेकरांची लांबच लांब रांग

तुमच्या छत्र्या मोफत दुरुस्त करून दिल्या जाणार आहेत. आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करून दिली जाईल, असे पोस्टर मोठ्या अक्षरात लिहिले आहे. म्हणून ही संधी कोण सोडणार त्यामुळे पुणेकरांची सकाळपासूनच काँग्रेस भवनाच्या बाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी छत्र्या घेऊन लांबच लांब रांग लागली. तर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे काँग्रेसचा हा उपक्रम पुणेकरांच्या पसंतीसही उतरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार?”, मोदींचा राज्यांना सवाल

News Desk

अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजारांच्या पुढे आढळले कोरोना रूग्ण

News Desk