HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारने शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिनेच काढून टाकले, या मागील बोलविते धनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आहेत काय?  

मुंबई | राज्यात आज (२७ फेब्रुवारी) सर्वत्र मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा होत असतानाच शासनाच्या दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ठाकरे सरकारला मराठी महिन्यांचाही तिरस्कार झाला आहे. या सरकारने शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिनेच काढून टाकले असून या मागील बोलविते धनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने २०२१च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्यांसोबतच मराठी महिन्यांचा सुद्धा उल्लेख करण्याचा कायदा आहे. परंतु २०२१ च्या दिनदर्शिकेत मराठी महिन्यांचा उल्लेखच गाळला गेला आहे.

त्यातही धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई मंत्री असलेल्या उद्योग विभागाच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असली तरीही यात पर्यटन विभागाची प्रसिद्धी करण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागील बोलविता धनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

मराठी शाळेत शिक्षण घेतले म्हणून मुंबई महानगरपालिकेत नोकरी नाकारणे, मराठी विद्यापीठ स्थापन करण्याला जाणीवपूर्वक उशीर करणे, मराठी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविणे, मुंबईतील मराठी शाळा बंद करणे अशा अनेक प्रकारांमधून ठाकरे सरकारचे व शिवसेनेचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट होते, असं सांगतानाच सरकारने ही दिनदर्शिका तात्काळ मागे घेऊन त्यात मराठी महिन्यांचा उल्लेख करूनच नव्याने दिनदर्शिका प्रकाशित करावी अन्यथा आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार! – मुख्यमंत्री

News Desk

महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, बावनकुळेंचा गौप्यस्फोट!

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला

Aprna