मुंबई | भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर…ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय आहेत असा टोला लगावला.
अभिनेत्री कंगना राणावत म्हणजे नॉटी गर्ल आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल (७ सप्टेंबर) केले होते. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत म्हणाले होते.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.