HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्लीवरून इंजेक्शन आणणं सुजय विखेंना पडले महागात, कोर्टात याचिका झाली दाखल

औरंगाबाद | भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरसाठी दिल्लीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा आणला होता. त्या प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढणार असं दिसून येत आहे. दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली आहे.

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

याचिकाकर्त्यांची काय मागणी आहे?

ही औषध तात्काळ ताब्यात घ्यावीत आणि त्याचं योग्यप्रकारे कायदेशीर गरजूंना वाटप करण्यात यावं अशीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने या याचिकेची दखल घेतली आहे. इतकंच नाही तर राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील प्रज्ञा तळेकर यांनी दिली आहे.

रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा का दाखल केला जाऊ नये अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. २९ तारखेपर्यंत समर्पक उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रेमडेसिव्हीरच्या काळाबाजराची न्यायालयाला शंका आहे.

त्यामुळे सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आता २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

सुजय विखेंनी काही इंजेक्शन आणल्याचा दावा

सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. ही इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली होती.

२२ एप्रिलला सुजय विखे यांनी हा रेमडेसिव्हीरचा

‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. त्यानंतर त्यांनी २ दिवसांनी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले होते.

रूपाली चाकणकर यांनीही शंका उपस्थित केली होती. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही शंका उपस्थित केली आहे. खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिवीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, असं आव्हानच चाकणकर यांनी दिलं आहे. त्यामुळे सुजय यांनी आणलेल्या बॉक्समध्ये खरोखरच इंजेक्शन होते का? सुजय विखेंनी व्हायरल केलेला व्हिडीओ खरा होता का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद, भाजपकडून टीकास्त्र सुरु

News Desk

खरा मास्टरमाईंड सुनिल पाटील, नवाब मलिकांवर षडयंत्राचा मोहित कंबोज यांचा आरोप

News Desk

डोंबिवलीमध्ये द. आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीला कोरोना, नव्या व्हेरियंटची लागण झाली की नाही?

News Desk