HW News Marathi
महाराष्ट्र

‘अंग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्ट पवार साहेबांचा’, भाजपची टीका

मुंबई | राष्ट्रवादीचे काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाल्यानंतर अनेक गोष्टी झाल्या असतील अश्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर (२१जून) सोमवारी पुन्हा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. या दोघांच्या भेटीनंतर आता राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली. याचसंदर्भात शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर शरद पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर टिकांची तोफ डागलीये.

प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी पुन्हा भेट घेऊन चर्चा केली आणि याआधी (११ जून) रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आज (२२जून) शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक होत ,आहे या सर्व घटना घडामोडींना लक्ष्य करत भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून चांगलाच निशाणा साधलाय, तर

शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

पवारांच्या चर्चेचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर

“भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे,” असा टोला अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

Aprna

पेनड्राईव्हवर आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

Aprna

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालास उशिर होण्याची शक्यता

News Desk