HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण, भाजपची जहरी टीका

मुंबई | राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, यातच जर लोकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल (२१ फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधताना विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले आहेत. लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका करताना भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं, आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते साफ खोटं आहे, आफ्रिकेतून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण होते, लसीकरणात महाराष्ट्राचा नंबर देशात सर्वात शेवटचा का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, संचारबंदी आणि लॉकडाऊन असे इशारे देऊन काही फायदा होणार नाही, स्वतःच्या अपयशाबद्दल जनतेला दोष देऊ नका असा टोलाही अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

News Desk

#CoronaVirus : सीएए, एनआरसीविरोधातील ‘मुंबई बाग’ आंदोलन तूर्तास स्थगित

swarit

SEBC मधून अ‍ॅडमिशन न घेता त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल – अशोक चव्हाण

News Desk